बांदा/प्रतिनिधी
नेतर्डे येथील युवकाची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे . सदर युवकाचे युट्यूब चॅनेल हॅक करण्यात आले आहे . तशा आशयाची तक्रार साहील संतोष कुबल ( २१ , नेतर्डे ) याने बांदा पोलीसात दिली आहे . पुढील तपास कुडाळ पोलीस निरीक्षक श्री . हुलावळे करीत आहेत .
याबाबत बांदा पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की , नेतर्डे येथील युवक साहील कुबल याने डिसेंबर २०२१ मध्ये लँड ऑफ फॅक्टस् या नावाने युट्यूबवर अकाउंट सुरु केले होते . यात मोटीव्हेशनल व शैक्षणिक व्हिडिओ शेअर करण्यात येत होते . ३० सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्याने अकाउंट साईन आऊट केले . मात्र , त्यानंतर सदर अकाउंट ओपन झाले नाही . त्यामुळे सदर चॅनेल हॅक झाल्याचा त्याला संशय आला . त्याबाबतची फिर्याद बांदा पोलीसात त्याने दिली . त्यानुसार माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ ( सी ) व ६६ ( डी ) अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी दिली . कुडाळ पोलीस निरीक्षक श्री . हुलावळे पुढील तपास करीत आहेत .
युवकाचे युट्यूब हॅक करून युवकाची ऑनलाईन फसवणूक
