रोटरी क्लब मालवणतर्फे मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.११-: रोटरी क्लब मालवण तर्फे शालेय मुली व स्त्रियांसाठी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात आला. या अंतर्गत ७००० बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्सचे वितरण करण्यात आले. यात मुलींना सहा महिने पुरतील एवढी पॅड्स क्लब मार्फत पुरविण्यात येणार आहेत. तसेच आरोग्यसेविका व अंगणवाडी सेविकांना मेन्स्ट्रुअल कपचे वाटप करण्यात आले. तर एका शाळेला नॉनइलेक्ट्रिक इंसिनेरटर प्रदान करण्यात आला.

यावेळी मालवणचे तहसीलदार अजय पाटणे तसेच मालवण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष रतन पांगे यांनी सर्वांचे स्वागत केले. रोटरी क्लबच्या एम एच एम डायरेक्टर डॉ. लीना लिमये यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद करताना महिलांचे व मुलींचे आरोग्य जपताना पर्यावरण रक्षणाचाही विचार केला असल्याचे नमूद केले. तसेच कॅशफ्री रॅशफ्री व ट्रॅश फ्री अशा मेन्स्ट्रुअल कपचा जास्तीत जास्त वापर व्हावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मासिक पाळी विषयी माहिती असलेली पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. कागदाचा अपव्यय टाळण्यासाठी हि पुस्तिका ई बुकच्या स्वरूपात शाळांसाठी उपलब्ध करण्यात आली. तहसीलदार अजय पाटणे यांनी रोटरीच्या उपक्रमाचे कौतुक केले. तर मुख्याधिकारी श्री. जिरगे यांनी रोटरी हा थिंक टॅंक असुन अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी रोटरी असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर व प्रणय तेली यांनीही मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या वतीने सौ. रोहिणी दिघे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय जोशी व रंजन तांबे यांनी केले. आभार सचिव अभय कदम यांनी मानले. कार्यक्रमाचे यावेळी रोटरीचे डॉ. अजित लिमये, सुहास ओरसकर, भाऊ साळगावकर, बाळु तारी, उमेश सांगोडकर, महेश काळसेकर, पंकज पेडणेकर, रमाकांत वाक्कर उपस्थित होते .

You cannot copy content of this page