⚡बांदा ता.१०-: बांदा-निमजगा परिसरात जलसंधारणाच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा अंतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, अस्मिता ग्रामसंघाच्या प्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमातून लोकसहभागातून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमात आरोग्य कर्मचारी राम पवार, दिग्विजय जाधव, आरोग्य सेविका गंगावणे, बांदा उपकेंद्राच्या आशा सेविका व मदतनीस, अस्मिता ग्रामसंघाच्या सीआरपी मृणाली सावंत व त्यांचे सहकारी तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.
या बंधारा बांधणी उपक्रमाला पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती सुश्मिता जाधव, पंचायत समिती सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्र बांदाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, बांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका नाईक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संजय सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली.
जलसंधारणाच्या कामात विविध शासकीय यंत्रणा, महिला बचत गटांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे सहभाग घेतल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
फोटो:-
बांदा निमजगा येथे बंधारा बांधण्यात आला.

