⚡सावंतवाडी ता.१०-: मुक्ताई ॲकेडमीने शालेय विदयार्थ्यांसाठी कै.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. खासकिलवाडा येथील राजवाड्याच्या मागील बाजूस पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात बुदधिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील शाळांमधील मर्यादित विदयार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. मुक्ताई ॲकेडमी तालुक्यातील विदयार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गेली दहा वर्षे अशा स्पर्धेचे आयोजन करते आहे. सकाळी 9:30 वाजता स्पर्धेचे उदघाटन करण्यात येईल.
स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटात खेळविण्यात येईल. प्रत्येक गटातील पाच विजेत्यांना रोख रक्कम, मेडल, चषक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक गटातील तीन मुलींना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील. सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेसाठी नावनोंदणी शुक्रवार दि.16 ऑक्टोबर पर्यंत करायची आहे. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी श्री.कौस्तुभ पेडणेकर, मोबाईल क्रमांक 8007382783 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन सरचिटणीस सौ.स्नेहा पेडणेकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील मुक्ताई ॲकेडमीचा पहिला राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर याच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. आयोजकांचा निर्णय सर्वांसाठी अंतिम आणि बंधनकारक राहील.

