Headlines

वेंगुर्ला मातोश्री कला क्रिडा मंडळ मार्फतसार्वजनिक नवरात्रौत्सव

वेंगुर्ला
वेंगुर्ला शहरातील मातोश्री कला क्रिडा मंडळ
दाभोली नाका मार्फत
सार्वजनिक नवरात्रौत्सव सन २०२६ निमित्त
प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.11 ऑक्टोबर ते मंगळवार दि. 20 ऑक्टोबर या कालावधीत दाभोली नाका, वेंगुर्ला येथे सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन केले आहे.शनिवार दि. 10 ऑक्टोबर रोजी
सायंकाळी ४ वा. दाभोसवाडा, जूना एसटी स्टॅण्ड, कलानगर, शिरोडा नाका ते दाभोलीनाका येथे दुर्गामातेचे सवाद्य मिरवणूकीने आगमन.
रविवार दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. श्री देवी दुर्गामाता पूजन, महाआरती, तिर्थप्रसाद, सायंकाळी ६.३० वा. भजन व महाआरती. रात्री ७.३० वा. दांडिया. रात्री ८.३० वा. संकल्प क्रिएशन डान्स अॅकडमी कुडाळ प्रस्तुत ‘नृत्यरंग’.
मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी
संध्याकाळी ६.३० वा. भजन व महाआरती. रात्रौ ०७.३० वा. दांडिया
रात्री ८.३० वा. नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतार लोकनाट्य मंडळ मोचेमाड-वेंगुर्ला यांचा महान ‘येळार ज्योतिर्लिंग स्थापना’ हा दणदणीत नाट्यप्रयोग.
मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी
सायंकाळी ६.३० वा. भजन व महाआरती, रात्री ७.३० वा. दांडिया, रात्री ८.३० वा. ‘वेषभूषा स्पर्धा व तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा’.
बुधवार दि. १४ ऑक्टोबर रोजी
सायंकाळी
४ वा.ते ६ वा. हिंदू धर्माभिमानी चैत्र नवमी महिला ग्रुप, वेंगुर्ला प्रस्तुत ‘महालक्ष्मीष्टक स्तोत्र व अन्नपूर्णा स्तोत्र’ पठण आणि भजन, सायंकाळी ६.३० वा. भजन व महाआरती. रात्री ७.३० वा. दांडिया, रात्रौ ८.३० वा. नृत्य कला डान्स अॅकडमी सावंतवाडी प्रस्तुत ‘नृत्य बहार’.
गुरुवार दि.15 ऑक्टोबर रोजी
सायंकाळी ६.३० वा. भजन व महाआरती. रात्री ७.३० वा. दांडिया,
रात्री ८.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम.
शुक्रवार दि.१६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वा. भजन व महाआरती, रात्रौ ७.३० वा. दांडिया,
रात्रौ ८.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम.शनिवार 17 ऑक्टोबर रोजी
सायंकाळी ६.३० वा. भजन व महाआरती. रात्री ०७.३० वा. दांडिया.
रात्री ८.३० वा. लावण्यसखी ग्रुप मालवण यांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रम.
रविवार दि.18 ऑक्टोबर रोजी
सायंकाळी ६.३० वा. भजन व महाआरती. रात्रौ ७.३० वा. दांडिया,
रात्री ८.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम.
सोमवार 19 ऑक्टोबर रोजी
सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा, तिर्थप्रसाद, दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वा. भजन व महाआरती, रात्रौ ७.३० वा. दांडिया, रात्री ८ वा. विविध स्पर्धाचे बक्षिस वितरण, रात्रौ ८.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम. मंगळवार 20 ऑक्टोबर रोजी
सायंकाळी ४ वा. महाआरती, सायंकाळी ५ वा. श्री देवी दुर्गामातेची :
दाभोली नाका-पिराचा दर्गा-श्रीराम मंदिर मार्ग-गाडीअड्डा नाका-बाजारपेठ जुने बस स्थानक ते मांडवी अशी सवाद्य विसर्जन मिरवणूक. रात्री ९.३० वा. मांडवी खाडी येथे श्री देवी दुर्गामाता विसर्जन संपन्न होणार आहे.
नवरात्रौत्सव दरम्यान दररोज सकाळी ९ वा. श्री देवी दुर्गा माता नित्य पूजन, दुपारी १२ वा. नित्य नैवेद्य. भाविकांनी व रसिकांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मातोश्री कला-क्रीडा-मंडळ आणि नवरात्रौत्सव समिती, दाभोली नाका, वेंगुर्ला अध्यक्ष विलास गावडे व उपाध्यक्ष सचिन शेट्ये यांनी केले आहे.

You cannot copy content of this page