⚡वेंगुर्ला ता.१०-: निवती पोलिसांनी बंधारा साकारत जलसंवर्धनाच्या दृष्टीने प्रशासनाच्यासह स्तुत्य पाऊल टाकले आहे.
निवती पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्यासह पोलीस स्टाफ आणि होमगार्ड तसेच खवणे ग्रामपंचायत सदस्य अवीनाश खोत, पोलीस पाटील खवणे, कृषी सहाय्यक तसेच इतर ग्रामस्थ यांनी संभाव्य दुष्काळाच्या अनुषंगाने पाणी आडवा…. पाणी जिरवा…. पाणी वाचवा….! या मोहिमेच्या औचित्याने भूत कोंड वाडी खवणे, (ता. वेंगुर्ला) येथे श्रमदानातून कच्चा बंधारा बांधला. कार्यक्षेत्रात पोलीस बंदोबस्तसह, कायदा सुव्यवस्था राखण्यासह शासनाच्या जलसंधारण मोहिमेत कर्तव्यासह जबाबदारी निभावत असताना
“जलसंवर्धनाच्या” दृष्टीने निवती पोलिसांच्या या तातडीच्या उपक्रमाचे वेंगुर्ला तालुक्यासह जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

