Headlines

युवकांच्या मनांत जाज्वल्य देशप्रेमाची भावना असली पाहिजे

-मंत्री रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन* ⚡ओरोस ता.०६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आज जगातील महासत्तेच्या होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. यांमध्ये युवकांचे नक्कीच मोठे योगदान आहे. त्यामुळे युवकांच्या मनामध्ये जाज्वल्य देशप्रेमाची भावना असली पाहिजे. आजच्या युवक पिढीने आपल्या आयुष्यातील काही क्षण देशसेवेसाठी दिल्यास याच युवा पिढीमधून उद्याचा सैनिक, डॉक्टर, इंजिनिअर नक्कीच निर्माण होईल…

Read More

महाराष्ट्र राज्यखाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचा स्नेहमेळावा ८ रोजी

⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ-: महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचा वार्षिक स्नेह मेळावा सातार्डा येथील खाजगी प्राथमिक शाळा रायाचे पेड येथे ८ जानेवारी रोजी आयोजित केला आहे. प्रथमच या शाळेत होणारा भव्य दिव्य वार्षिक स्नेह मेळावा मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असून,या मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून…

Read More

प्रभाग १ मध्ये विकास निधी मंजूर करा

माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांची पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.०६-: शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, गटार बांधणे, संरक्षण भिंत बांधणे, रस्त्याचे रुंदीकरण करणे, प्री कॉस्ट…

Read More

सातार्डा देऊळवाडी शाळेत आज रक्तदान शिबिर

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांचा पुढाकार बांदा/प्रतिनिधीगोवा-बांबोळी येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने जीएमसीच्या रक्तपेढी विभागाने सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांच्याशी संपर्क साधून तात्काळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत आवाहन केले होते. श्री पिळणकर यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देऊन सातार्डा-देऊळवाडी येथे जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नं १ येथे आज…

Read More

शिवराजेश्वर मंदिराचे रखडलेले काम १५ जानेवारी पासून होणार सुरू

आ नाईक यांची सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा;ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती ⚡मालवण ता.०५-: ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिर नूतनीकरणाच्या बंद असलेल्या कामाबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधून मंदिर नूतनीकरणाचे काम कधी पर्यत सुरु करणार असल्याची विचारणा केली.त्यावर सदर काम येत्या १५ जानेवारी २०२३…

Read More

भाजपाने जिल्ह्यात कारखाने, कंपन्या आणून युवकांना रोजगार द्यावा

सावंतवाडी येथील आजच्या रोजगार मेळाव्यातील गर्दीवरून मंगेश तळवणेकर यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा व शिंदे गटाची एक हाती सत्ता आहे. राज्यात केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे तातडीने सुमारे 2 लाख तरुण-तरुणींचा रोजगार मेळावा घेऊन परजिल्ह्यात, परराज्यात जाणाऱ्या तरुण-तरुणी यांना नोकरी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून त्यांना आपल्या घरी राहून वृद्धापकाळात आई-वडीलांना शेती कामात मदत…

Read More

मळेवाड येथे ६ जानेवारी रोजी रस्सीखेच स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.०५- : मळेवाड येथील माऊली युवक कला क्रीडा मंडळ नाईकवाडी आयोजित भव्य मळेवाड मर्यादित रस्सीखेच स्पर्धा शुक्रवार ६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मळेवाड – कोंडूरे ग्रामपंचायत नजीक आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुरुष आणि महिला गटात खेळवली जाणार आहे. स्पर्धेसाठी पुरुष गट वजन ६०० किलो असून संघामध्ये फक्त ८ खेळाडू खेळतील व…

Read More

एक हजार ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त

मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची आंबेरीत धडक कारवाई… ⚡मालवण ता.०५-: अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीवर मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून धडक कारवाई सुरू ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री आंबेरी सडा येथे एका जागेत खाडी पात्रातून उत्खनन करून ठेवलेला सुमारे एक हजार ब्रास वाळू साठा महसूल पथकाने सील केला आहे. अनधिकृत वाळू…

Read More

आकर्षक चित्ररथआणि ढोल ,ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा

कणकवली पर्यटन महोत्सवात शोभयात्रेने शानदार प्रारंभ ⚡कणकवली ता.०५-: कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी शहरातून ढोल ,ताशांच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली. श्री पटकीदेवी मंदिराकडून बाजारपेठ मार्गे अप्पासाहेब पटवर्धन चौकातून येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पर्यटन महोत्सवाच्या स्थळापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शोभायात्रेचे शुभारंभ डॉ. गुरुदास कडुलकर यांच्या हस्ते झाला.यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय…

Read More

आंबेगाव म्हारकाटेवाडी येथे उभारला वनराई बंधारा

ग्राम पंचायत आणि वन विभागाचा संयुक्त उपक्रम ⚡सावंतवाडी ता.०५-: आंबेगाव ग्रामपंचायत व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव म्हारकाटेवाडी येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी आंबेगाव चे सरपंच श्री शिवाजी परब, उपसरपंच श्री रमेश गावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री योगेश गवळी, ग्रा. पं.सदस्या.साक्षी राऊळ, ग्रा. पं. सदस्या. आनंदी मुळीक. ग्रामसेवक श्री अमित राऊळ, वनरक्षक डी. बी….

Read More
You cannot copy content of this page