⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ-: महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचा वार्षिक स्नेह मेळावा सातार्डा येथील खाजगी प्राथमिक शाळा रायाचे पेड येथे ८ जानेवारी रोजी आयोजित केला आहे.
प्रथमच या शाळेत होणारा भव्य दिव्य वार्षिक स्नेह मेळावा मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असून,या मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून माजी शिक्षण विस्तार अधिकारी शुभांगी देशपांडे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सातार्डा सरपंच संदीप प्रभू, सातार्डे मध्यवर्ती संघ मुंबई अध्यक्ष महेन्द्र मांजरेकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके,आजगाव विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर प्रभाग, केंद्रप्रमुख श्रद्धा महाले ,माजी केंद्रप्रमुख रवींद्र गवस, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, पत्रकार निलेश मोरजकर, संदीप कदम, शिक्षक, पालक, विद्यार्थी,ग्रामस्थांच्या या उस्थितीतत हा मेळावा पार पडणार असून या मेळाव्यात विविध कार्यक्रम,पुरस्कार वितरण होणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका सचला आरोलकर यांनी सांगितले.
