माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांची पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी
⚡सावंतवाडी ता.०६-: शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, गटार बांधणे, संरक्षण भिंत बांधणे, रस्त्याचे रुंदीकरण करणे, प्री कॉस्ट पर्श्या बसवणे आदी कामांचा समावेश आहे.
