Headlines

वेंगुर्ल्यात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

वेंगुर्ला
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वेंगुर्ला येथील कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून दिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील योगदान, अनुभव आणि मार्गदर्शन हे पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी बोलताना नमूद केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश रेगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष किशोर नरसुले, कार्यवाह जगदीश तिरपुडे, सदस्य शामराव काळे आणि सदस्य प्रदीप कुबल आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर व्यक्त करून त्यांच्या अनुभवांना आणि सामाजिक योगदानाला सलाम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहात पार पडला.

You cannot copy content of this page