आकर्षक चित्ररथआणि ढोल ,ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा

कणकवली पर्यटन महोत्सवात शोभयात्रेने शानदार प्रारंभ

⚡कणकवली ता.०५-: कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी शहरातून ढोल ,ताशांच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली. श्री पटकीदेवी मंदिराकडून बाजारपेठ मार्गे अप्पासाहेब पटवर्धन चौकातून येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पर्यटन महोत्सवाच्या स्थळापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली.

यावेळी शोभायात्रेचे शुभारंभ डॉ. गुरुदास कडुलकर यांच्या हस्ते झाला.यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, बांधकाम सभापती विराज भोसले, कविता राणे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, शिशिर परुळेकर, आण्णा कोदे, महेश सावंत, किशोर राणे, बाळा सावंत, रवींद्र गायकवाड, शिवसुंदर देसाई, संजीवनी पवार, निखिल आचरेकर, यांच्यासह पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते. कणकवली शहरातील 17 प्रभागांचे चित्ररथ व पारंपारिक वेशभूषा तसेच कोकणच्या संस्कृतीचे दर्शन या शोभायात्रेतून घडविण्यात आले. बैलगाड्यांसह दशावतारी कला संस्कृती सुद्धा या शोभायात्रेतून दाखविण्यात आली. याच सोबत कोकणात मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या बुरुड कामाचा देखील चित्ररथ देखावा या शोभायात्रेत लक्षवेधी ठरत होता. कणकवली पटकीदेवी समोरून कणकवली महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाच्या शुभारंभ पूर्वी शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सिंधू गर्जना ढोल पथकाच्या निनादात पटकीदेवी कडून बाजारपेठ मार्गे सुरू झालेली ही शोभायात्रा पर्यटन महोत्सव स्थळाच्या दिशेने मार्गस्थ झाली. कणकवली बाजारपेठ मधून शोभायात्रा महामार्ग वरून पर्यटन महोत्सव स्थळाच्या दिशेने रवाना झाली. या शोभायात्रेत भव्य शोभायात्रेने या महोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर कार्यक्रम स्थळी काही वेळातच केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह प्रमुख मान्यवर नेतेमंडळींच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे.

You cannot copy content of this page