Headlines

भजन-कीर्तनातून संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कौतुकास्पद…

युवा नेते विशाल परब:तळवडेत नामस्मरण चक्रीभजन महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न..

⚡सावंतवाडी ता.२३-: भजनप्रेमी व ग्रामस्थांच्या वतीने तळवडे येथे आयोजित करण्यात आलेला नामस्मरण चक्रीभजन महोत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला भाजप महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब तसेच सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी उपस्थित राहून भजनप्रेमी, ग्रामस्थ व देवस्थान कमिटी सदस्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्या गावची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपली जात आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची आणि आध्यात्मिक परंपरेची ओळख होते. तळवडे ग्रामस्थांनी आयोजित केलेला हा भक्तिमय उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.”
‘रामकृष्ण हरी’च्या नामघोषाने आणि पारंपरिक भजनाच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विविध भजन मंडळांनी सहभाग घेत महोत्सवाची रंगत वाढविली.
या कार्यक्रमास रुपेश राऊळ, रविंद्र काजरेकर (माजी सरपंच), आप्पा परब (तळवडे सोसायटी चेअरमन), सुनील परब (प्रमुख गावकर), शाम गावडे, काशिनाथ कुंभार, प्रमोद गावडे, राजाराम गावडे (प्रहार पत्रकार), आनंद बुगडे, सुनील सावंत (जिल्हा बँक व्यवस्थापक), चिंतामणी जाधव, रमेश परब, गजानन परब, बाळा जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व देवस्थान कमिटी सदस्य उपस्थित होते.
तळवडे ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि भक्तिभावाने पार पडलेल्या या महोत्सवामुळे गावातील धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक भक्तिमय झाले.

You cannot copy content of this page