रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून अभियान: सर्व भाजप पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, कार्यकर्त्यांनी निवेदन घेऊन उद्या उपस्थित राहावे: उपनगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर यांचे आवाहन..
⚡सावंतवाडी ता. २३ – महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून आणि विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्या संयोजनाखाली संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी ‘सेवा अभियान’ राबवण्यात येत आहे.उद्या सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील काजी शहाबुद्दीन हॉल येथे या अभियानाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.तरी सर्व भाजप पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील समस्यांचे निवेदन घेऊन उपस्थित राहाव ,असे आवाहन उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष यांनी सांगितले की, या अभियानासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे पूर्ण सहकार्य असून जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष विशाल परब, संदीप गावडे, उपसभापती गौरव मुळीक यांच्यासह सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, मंडल अध्यक्ष हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.या अभियानांतर्गत प्रभागातील, गावातील, वाडीतील ज्या काही विकासकामे, अडचणी व समस्या असतील त्यांचे लिखित स्वरूपात निवेदन तयार करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावे उद्या हॉलमध्ये सादर करावे. त्या निवेदनांचा प्रदेश कार्यालयात सखोल विचार करून आपल्या प्रभागात, गावात, तालुक्यात जो निधी हवा असेल किंवा जी समस्या असेल तिचे निराकरण भाजपच्या माध्यमातून केले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सर्व भाजप पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील समस्या लिखित निवेदनाच्या स्वरूपात उद्या सकाळी १० वाजता काजी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे घेऊन यावे, असे आवाहन उपनगराध्यक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.
