Headlines

दिल्ली ऑल इंडिया थलसेना कॅम्पसाठी सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागाची रूपाली करंगुटकरची निवड

मालवण दि प्रतिनिधी

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागातील सीनियर अंडर ऑफिसर रूपाली करंगुटकर हिची दिल्ली येथे 31 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प – फायरिंग कॉम्पिटिशनसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.

रूपाली करंगुटकर हिने गेल्या जून महिन्यापासून सुरू झालेल्या निवड प्रक्रियेत सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांमधून तिची सुरुवातीला निवड झाली. त्यानंतर 58 महाराष्ट्र बटालियन, ओरस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोल्हापूर येथे आयोजित विविध प्रशिक्षण व निवड शिबिरांमध्ये तिने सहभाग घेतला.
रूपालीच्या या यशामध्ये 58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक तसेच बटालियनमधील इतर आर्मी ऑफिसर्स यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर कॉलेजचे NCC विभागाचे प्रमुख असोसिएट NCC ऑफिसर लेफ्टनंट प्रा डॉ. एम. आर. खोत यांचेही रूपालीला सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले.

रूपालीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे, सहसेक्रेटरी संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई यांच्यासह संचालक तसेच स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य के. के. राबते तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख असोसिएट NCC ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांनी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विध्यार्थ्यांनी अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page