Headlines

सुभाष लाड यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी निवड

मालवण दि प्रतिनिधी :

गोळवण-कुमामे-डिकवल गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच श्री. सुभाष लाड यांची ग्रामसभेत सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी श्री. आप्पा घाडी यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.

गावातील तंटे व वाद सामोपचाराने मिटवून गावात सलोखा, शांतता आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी तंटामुक्ती समिती महत्त्वाची भूमिका बजावते. या पार्श्वभूमीवर सुभाष लाड यांची अध्यक्षपदी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष लाड, उपाध्यक्ष आप्पा घाडी तसेच समितीच्या सर्व सदस्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page