भाजपाने जिल्ह्यात कारखाने, कंपन्या आणून युवकांना रोजगार द्यावा

सावंतवाडी येथील आजच्या रोजगार मेळाव्यातील गर्दीवरून मंगेश तळवणेकर यांची मागणी

⚡सावंतवाडी ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा व शिंदे गटाची एक हाती सत्ता आहे. राज्यात केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे तातडीने सुमारे 2 लाख तरुण-तरुणींचा रोजगार मेळावा घेऊन परजिल्ह्यात, परराज्यात जाणाऱ्या तरुण-तरुणी यांना नोकरी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून त्यांना आपल्या घरी राहून वृद्धापकाळात आई-वडीलांना शेती कामात मदत करुन त्यांनाही किमान 20 ते 25 हजार प्रतिमहा पगार शिल्लक राहील. यासाठी तातडीने भाजपने सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यात छोटे-मोठे कारखाने, कंपन्या, फॅक्टऱ्या सुरु करुन येथील तरुण-तरुणींना रोजगार मिळवून द्यावा मागणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page