⚡सावंतवाडी ता.०५- : मळेवाड येथील माऊली युवक कला क्रीडा मंडळ नाईकवाडी आयोजित भव्य मळेवाड मर्यादित रस्सीखेच स्पर्धा शुक्रवार ६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मळेवाड – कोंडूरे ग्रामपंचायत नजीक आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुरुष आणि महिला गटात खेळवली जाणार आहे.
स्पर्धेसाठी पुरुष गट वजन ६०० किलो असून संघामध्ये फक्त ८ खेळाडू खेळतील व २ खेळाडू राखीव असतील. महिलांसाठी वजनाचा पर्याय नसेल फक्त ८ खेळाडू खेळतील व २ राखीव असणार आहेत.
पुरुष गट स्पर्धेसाठी प्रथम ३००० रु. आणि आकर्षक चषक, द्वितीय २००० रु.
आणि आकर्षक चषक असे आहे. स्पर्धेची प्रवेश फी ३०० रु. एवढी आहे. महिला गट स्पर्धेसाठी प्रथम १५०० रु. आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक १००० रु. आणि आकर्षक चषक असे असून प्रवेश फी २०० रु. आहे. अधिक माहितीसाठी अमोल- ९१४६६१९८१६, सुमित- ८३९०१६२६८४, दाजी- ७०२०८६४४२४, तुषार- ९०४९८७६००३ व लक्ष्मण= ९३२२८८७५९४ या नंबरवर संपर्क साधावा. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त संघांनी सहभाग घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
