जिल्हास्तरीय स्वरचित काव्य वाचन स्पर्धा २६ रोजी
साने गुरुजी वाचन मंदिराचे आयोजन
साने गुरुजी वाचन मंदिराचे आयोजन मालवण दि प्रतिनिधीमराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधून मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिरच्यावतीने जिल्हास्तरीय खुल्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यां स्पर्धकास १००१/- रुपये व प्रमाणपत्र द्वितीय विजेत्या स्पर्धकास ७०१/- रुपये…
