कुडाळ : बॅ. नाथ पै बी.एड. महाविद्यालय, कुडाळ येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक संलग्नित ‘पालकत्व शिक्षणक्रम’ तसेच ‘मार्गदर्शन व समुपदेशन पदविका’ या शिक्षणक्रमांना विद्यापीठाची नुकतीच मान्यता मिळाली आहे.
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पालकांमध्ये ताण-तणावाचे प्रमाण वाढत आहे. मुलांच्या संगोपनासाठी शास्त्रशुद्ध पालकत्वाची आवश्यकता असून, पालकांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने हा प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरू करण्यात आला आहे. मुलांच्या वाढीतील प्रत्येक टप्प्यावर योग्य निर्णय घेणे, बालकांमधील कौशल्यांचे आकलन करणे, डिजिटल युगातील आव्हानांचा सामना करणे तसेच कुटुंबात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये या अभ्यासक्रमातून विकसित केली जाणार आहेत.
तसेच विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातील विविध स्तरांमध्ये तणावाचे प्रमाण वाढत असल्याने मार्गदर्शन व समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे. ही गरज लक्षात घेऊन प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशक मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने एक वर्षाचा ‘मार्गदर्शन व समुपदेशन पदविका’ अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू करण्यात आला आहे.
या दोन्ही अभ्यासक्रमांचा इच्छुक पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच मार्गदर्शन व समुपदेशन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन उमेश गाळवणकर, केंद्रप्रमुख परेश धावडे आणि केंद्र समन्वयक नितीन बांबार्डेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९३२५१०४६८४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कुडाळमध्ये पालकत्व शिक्षणक्रमासह मार्गदर्शन व समुपदेशन पदविका अभ्यासक्रम सुरू
