Headlines

एडगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राजू पवार यांची फेरनिवड..

वैभववाडी प्रतिनिधी
एडगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अभिजित उर्फ राजू पवार यांची पुन्हा एकदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमताने ही निवड केली.
​वर्षभर राजू पवार यांनी या पदावर चांगले काम केले आहे. दहा तंटे त्यांनी अत्यंत संयमाने, सामंजस्यपणे आणि सामोपचाराने मिटवले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे.
​राजू पवार हे तालुक्याच्या आत्मा समितीत कार्यरत आहेत. या ग्रामसभेस जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, सरपंच रवीना तांबे, उपसरपंच प्रज्ञा रावराणे, ग्रा.पं. सदस्य रवींद्र रावराणे, परशुराम पाष्टे, सौ. सायली घाडी, सौ. वैदेही रावराणे, ग्रामसेविका सौ. स्नेहलता सावंत, श्री. सचिन रावराणे, श्री. बच्चाराम रावराणे, श्री. प्रताप रावराणे, श्री. योगेश पवार, श्री. शैलेश रावराणे, सौ. वनिता पवार, श्री रवळनाथ विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. सुनील रावराणे, माजी उपसरपंच श्री. विनोद रावराणे तसेच तंटामुक्त समितीचे सन्माननीय सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page