Headlines

आमदार दीपक केसरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी…

संजू परब: दीपक भाईंमुळे मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी, बाबू कुडतरकर; मल्टीस्पेशलिस्टचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शिवसैनिकांनी फटाके वाजून आनंद उत्सव केला साजरा..

⚡सावंतवाडी, ता. २०-: लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला सावंतवाडीच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न अखेर मार्गी लागला असून, न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार दीपक केसरकर यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याचा दावा शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला.

परब म्हणाले की, सावंतवाडीच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी सातत्याने लक्ष दिले. हा प्रश्न कसा मार्गी लागेल, यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. अखेर न्यायालयाने निकाल देत काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिल्याने सावंतवाडीच्या आरोग्य क्षेत्रासाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.
सावंतवाडी मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे प्रश्न आमदार केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांचे मनापासून अभिनंदन करीत असल्याचे परब यांनी सांगितले.

यावेळी बाबू कुडतरकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करताना, आमदार केसरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लागत आहेत. आगामी काळात आरोग्यासोबतच रोजगाराचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page