Headlines

श्री देव पाटेकर, श्री देव उपलकर यांच्या आशीर्वादाने मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चा प्रश्न मार्गी लागला…

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले:पालकमंत्री नितेश राणे,आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले..

सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न श्री देव पाटेकर, श्री देव उपलकर यांच्या आशीर्वादाने मार्गी लागला आहे.
सावंतवाडीसाठी एक ऐतिहासिक निर्णय आज घेतला गेला आहे. राजघराण्यानं नेहमीच लोकांसाठी काम केलं असून यापुढेही ते करत राहू अशी भावना सावंतवाडीच्या नगराध्यक्षा तथा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केली आहे.

त्या म्हणाल्या, गेली अनेक वर्ष राजघराणे आणि शासनामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय अडकला होता. तो आज सुटला असून राजघराण्याने नेहमीच जनतेसाठी काम केलं आहे. त्यांनी आपली जागा जनतेच्या हितासाठी नेहमीच दिली आहे. यापूर्वीही गार्डन, नगरपालिका, कॉलेज, हॉस्पिटल आदींसाठी जागा राजघराण्याने दिली आहे. आज नगराध्यक्षा म्हणून राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानते. आज सर्वांच्या मेहनतीमुळे ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. राजघराण्याने नेहमीच लोकांसाठी काम केलं आहे अन् यापुढेही करत राहू अशी भावना सावंतवाडीच्या नगराध्यक्षांनी दिली आहे.

You cannot copy content of this page