वेंगुर्ला
डॉ.अजित साटेलकर मित्रमंडळ, वेंगुर्ला यांच्यामार्फत कै. महेश परब स्मृती चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा – २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे संपन्न झाली. या स्पर्धेला श्री चेस अकॅडमी व नवजीवन चेस अकॅडेमी यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत १६ वर्षांखालील, १३ वर्षांखालील आणि १० वर्षांखालील अशा विविध वयोगटांतील 122 बुद्धिबळपटूंनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम आणि डावपेचांचे दर्शन घडविले. या
कार्यक्रमाचे उदघाट्न डॉ. योग शिक्षिका डॉ. वसुधा मोरे, ज्येष्ठ साहित्यिका
वृंदा कांबळी, लेखिका व माजी शिक्षिका अस्मि साटेलकर, डॉ. अजित साटेलकर, गजानन परब, माजी उपसरपंच प्रा.हेमंत गावडे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलाने पार पडले. यावेळी जयेश परब, सागर करंगुटकर, निनाद दिपनाईक ,बाळकृष्ण मयेकर, भुवनेश परब, संकेत साळगावकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी प प्रत्येक गटामध्ये आकर्षक चषक, रोख रक्कम, पदके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली.स्पर्धेचे पारितोषिक वितरण सातेरी देवस्थानचे विश्वस्थ रवींद्र परब, वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, नगरसेविका गौरी मराठे, डॉ.अजित साटेलकर कृषी अधिकारी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, यांच्या हस्ते पार पाडले.या स्पर्धेचा सविस्तर निकाल :
10 वर्षा खालील गट : प्रथम विहान असपतवार, द्वितीय विघ्नेश अंबापूरकर, तृतीय अन्वय सापळे, चतुर्थ प्रज्वल नार्वेकर, पाचवा
मोहिषा जाधव.
13 वर्षाखालील गट : प्रथम दुर्वांक मलबारी, द्वितीय प्रसन्ना सामंत, तृतीय यश सावंत, चतुर्थ योगेश सामंत, पाचवा अथर्व वेंगुर्लेकर. 16 वर्षाखालील गट : प्रथम वरद तंवटे, द्वितीय तनिष तेंडोलकर, तृतीय रुद्र मोबारकर, चतुर्थ वसंत गवस,पाचवा :यथार्थ डांगी. उत्कृष्ट खेळाडू : सन्मिल अजित साटेलकर व उत्कृष्ट खेळाडू : गार्गी संदीप परब इत्यादीना गौरविण्यात आले.
वेंगुर्ला येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न
