Headlines

“कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार ” २०२६ श्रीमती वंदना करंबेळकर सावंतवाडी यांना जाहिर

मालवण दि प्रतिनिधी

आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रा.बि.सह.पतसंस्था मर्या.आचरा या संस्थेतर्फे देण्यात येणारा कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार २०२६ सावंतवाडीच्या श्रीमती वंदना करंबेळकर यांना जाहिर झाला असल्याची माहिती चेअरमन मंदार सांबारी यांनी दिली.

गेली ३ वर्षे श्रीकांत सांबारी यांच्या स्मृतीप्रित्यंर्थ हा पुरस्कार देण्यात येत आहे.यावर्षीचा हा ४था पुरस्कार सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वंदना श्रीकृष्ण करंबेळकर यांना जाहिर झाला आहे

शिक्षण,आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांचे अमूल्य असे योगदान लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहिर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर पुरस्काराचे वितरत २५ ऑगस्ट रोजी होणा-या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page