मालवण (प्रतिनिधी)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आणि बंड्या सरमळकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ऑगस्टला महिलांसाठी खुल्या ‘नारळ लढविणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मालवण बंदर जेटी येथे सायंकाळी ४ वाजता पार पडणार आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडी मालवण शहर संघटक सौ. राधिका मोंडकर यांनी दिली.
मालवण येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. मालवण शहर तसेच तालुक्यातील इतर भागातील महिलांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी अत्यंत आकर्षक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, याच कार्यक्रमात १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी ‘वेशभूषा स्पर्धा’ देखील आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सहभाग साठी पूजा करलकर – ७७४४९७२१११, निनाक्षी शिंदे – ९३२५९४२७९८, गौरी सावंत – ७५८८७७४४३६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सौ. मोंडकर यांनी केले.
यावेळी सोनाली डिचवलकर, पूजा करलकर, गौरी सावंत, अनिता गिरकर, माधुरी प्रभू, स्मिता सरमळकर, माधुरी जावकर, वैदेही सरमळकर, नीनाक्षी शिंदे, योगिता गावकर, वृंदा गवंडे आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
