मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड..
⚡मालवण,ता.२०-:
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या ५९ वा युवा महोत्सवात कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टाच्या विध्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले या महाविद्यालयाची प्राची संभाजी परब हिने कथाकथन (मराठी) या कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टाच्या विद्यार्थ्यांनी विविध कला, साहित्य व सांस्कृतिक प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली. कथाकथन या कला प्रकारात द्वितीय क्रमांक पटकविणाऱ्या प्राची परब हिला कॉलेजच्या प्रा. व्ही. आर. पालव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्राची परब हिच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्यासह संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डी. व्ही. मिराशी, उपप्राचार्य श्री. आर. जी. गावडे, सर्व प्राध्यापकवर्ग व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
