श्री देव पाटेश्वर लिंगेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण

⚡कुडाळ ता.०७-: तेर्सेबांबर्डे गावडेवाडी येथील श्री देव पाटेश्वर लिंगेश्वर मंदिर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायीक पारायण बुधवार दि.८ ते सोमवार दि.१३ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

८ फेब्रुवारी रोजी द्विप प्रज्वलन,विणा पुजन व मुर्ती पुजन करून या पारायणाला सुरवात करण्यात येणार आहे.याअंतर्गत रोज पहाटे ४ ते ६ वा.काकड आरती , ८ ते १२ वा. सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी १२.३० ते १.३० वा. महाप्रसाद, दुपारी २.३० ते ४ वा. नाटाचे भजन,४ ते ५ वा. प्रवचन,५.३० ते ६.३० वा.हरिपाठ, ७ ते ९ वा. किर्तन, रात्री ९.३० वा. महाप्रसाद आदी कार्यक्रम नियमितपणे होणार आहेत. बुधवार दि.८ फेब्रुवारी रोजी ह.भ.प‌.महादेव पाटील महाराज यांचे प्रवचन, ह.भ.प. विश्वनाथ महाराज कणकवली यांचे किर्तन, गुरूवार दि. ९ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.बाळासाहेब पाटील महाराज पुंगाव राधानगरी यांचे प्रवचन व किर्तन, शुक्रवार दि १० फेब्रुवारी रोजी ह.भ.प.नवनाथ रोंगे महाराज चांदे राधानगरी यांचे प्रवचन व कीर्तन, शनिवार दि ११ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. केशव जाधव महाराज पिशवी कोल्हापूर यांचे प्रवचन व कीर्तन, रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. डॉ.रविंद्र तावडे महाराज मुंबई यांचे प्रवचन व कीर्तन, सोमवार दि. १३ फेब्रुवारी ह.भ.प. आनंद जाधव महाराज करमळा कोल्हापूर यांचे प्रवचन व कीर्तन आदींची प्रवचने व कीर्तने होणार आहेत.मंगळवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ९ वा. ज्ञानेश्वरी वाचन, सकाळी १० ते १२ वा.ह.भ.प. आनंद जाधव महाराज यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद होणार आहे. या पारायणामध्ये व्यासपिठ चालक हे.भ.प.नामदेव पाटील महाराज मतिवडे बेळगांव हे असणार आहेत. तरी या कार्यक्रमांचा लाभ सर्वांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page