जिल्हास्तरीय स्वरचित काव्य वाचन स्पर्धा २६ रोजी
साने गुरुजी वाचन मंदिराचे आयोजन

साने गुरुजी वाचन मंदिराचे आयोजन

मालवण दि प्रतिनिधी
मराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधून मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिरच्यावतीने जिल्हास्तरीय खुल्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्यां स्पर्धकास १००१/- रुपये व प्रमाणपत्र द्वितीय विजेत्या स्पर्धकास ७०१/- रुपये व प्रमाणपत्र तृतीय विजेत्या स्पर्धकास ५०१/- रुपये व प्रमाणपत्र चतुर्थ विजेत्या स्पर्धकास ३०१/- व प्रमाणपत्र पाचव्या स्पर्धकास २०१/- व प्रमाणपत्र अशी पारितोषिके तसेच सहभागी सर्व कविंना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकाने स्वरचित कविता सादर करावयाची असून कविता मराठी किंवा मालवणी भाषेमध्ये असल्यास चालेल तसेच कविता २५ ओळींपर्यंत मर्यादित असावी. कवितेला विषयाचे बंधन नाही तर कविता लेखनासाठी काव्यप्रकाराचे बंधन नाही.

स्पर्धकांनी आपली कविता दिनांक २४ फेब्रुवारी पर्यंत बॅ. नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर धुरीवाडा, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग या पत्त्यावर पाठवावी. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रु.१००१/- ७०१/-; ५०१/-, ३०१/-; २०१/-अशी रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देण्यात येतील . सहभागी सर्व कविंना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मोबा नंबर ९४२२०५४६००/ ९४२०४२३७९०/ ९४०५६२३८५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन साने गुरुजी वाचन मंदिरच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page