स्वखर्चाने दोन कचरा कुंड्या उपलब्ध करून दिल्याने केला सन्मान
मालवण दि प्रतिनिधी
मालवण देऊळवाडा सातेरी मंदिर येथील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी मालवणचे माजी नगरसेवक दिपक पाटकर यांनी स्वखर्चाने दोन कचराकुंडी या भागासाठी भेट देण्यात आली यावेळी सातेरी मंदिर परिसरातील ज्येष्ठ नागरिक बाळू आचरेकर, अरविंद मराळ व आई सातेरी बाळगोपाळ मित्रमंडळाच्या वतीने दिपक पाटकर यांचा आज पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक बाळू आचरेकर, अरविंद मराळ, वसंत वीर, शरद यादव, प्रमोद करलकर, अशोक मराळ, जितेंद्र मराळ, संतोष मराळ, प्रमोद मराळ, शिवराम मराळ, उदय वीर, देवेंद्र मराळ, राहुल वीर, सुरज कदम, अक्षय मराळ, ऋषी मराळ, अनिकेत मराळ, अंकुश मराळ, पिंटू घाडी, श्री यादव हे यावेळी उपस्थित होते.
