वारकऱ्यांनी आधुनिक, चंगळवादाच्या दुनियेत हिंदू धर्माची पताका फडकत ठेवला

विश्व हिंदू परिषदेचे विलास हडकर यांचे प्रतिपादन

⚡[मालवण ता.०७]-: वारकऱ्यांनी आधुनिक आणि चंगळवादाच्या जमान्यात हिंदू धर्माची पताका सदैव फडकत ठेवली. संस्कृती आणि संपन्न परंपरा सदैव जपली. भागवत धर्माच्या रीती, रिवाज आणि परंपरा जनमानसात कायम ठेवल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद मालवणचे पालक श्री विलास हडकर यांनी येथे बोलताना केले

मालवण मेढा येथील विठ्ठल मंदिर येथे मंगळवारी वारकरी संप्रदायाचे गंगा पूजन संपन्न झाले. या निमित्ताने वारकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने वारकरी कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी यावेळी विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष भाऊ सामंत, प्रखंड मंत्री संदीप बोडवे, विलास हडकर, भिवा शिरोडकर, ललित चव्हाण, मनोज चव्हाण, अमित खोत, महेश कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमात माघ एकादशी साठी नुकतेच पंढरपूर वारीला गेलेल्या वारकऱ्यांना विश्व हिंदू परिषदेमार्फत शाल, पुष्प देऊन त्यांना वंदन करत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सुनील शिरोडकर, बंटी कवटकर यांच्या वतीने वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विलास हडकर यांनी सनातन धर्म आणि त्यापुढील आव्हाने यावरही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी वारकरी संप्रदायाचे सुधाकर दुधवडकर, आप्पा खोत, सुनील पोळ, मधुकर कांबळी, बाळा मांजरेकर, महादेव कोयंडे, दाजी परब, दादा सातोस्कर, दिनेश निकम, दादा कोळंबकर, महेश चव्हाण, गणेश हंजनकर, नरेश मसुरकर, उपेंद्र गावकर, नाचनकर, खोत, सुभाष मांजरेकर, प्रदीप बांदेकर, आनंद जोशी, सुजाता दुधवडकर, संगीता बांदेकर, सीताबाई कोयंडे, कांचन तारी, वृषाली धुरी, तेजस्विनी सारंग, सुरेखा चव्हाण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page