Headlines

वेंगुर्ला तालुका शिवसेनेतर्फे वेंगुर्ला शिरोडा येथे सामाजिक उपक्रम संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षातर्फे वेंगुर्ला तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. वेंगुर्ला शाळा नं. 3 सातेरी मंदिर समोरील शाळेत फॅनवाटप, वेंगुर्ला हायस्कुल मध्ये वृक्षारोपण, वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप, शिरोडा येथे वृक्षारोपण, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळेवाटप आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी, वेंगुर्ला पं.स. उपसभापती सचिन देसाई, शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब, नगरसेविका लीना म्हापणकर, सत्यवान साटेलकर, उमेश नाईक कौशिक परब, शितल साळगावकर, माजी सभापती सुनील मोरजकर, संतोष परब, हर्षद डेरे, स्वप्निल परब, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, संदीप पेडणेकर, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, मयूर आरोलकर, तसेच शहरातील व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page