श्रमदानातून यशवंत गडाची स्वच्छता

⚡वेंगुर्ला ता.०७-: शिवकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रमांतर्गत रेडी येथील ऐतिहासिक यशवंत गडाची स्वच्छता करण्यात आली.

        गड सुसज्ज राहण्यासाठी स्थानिक शिवप्रमी सातत्याने  संवर्धनाकरिता प्रयत्नशील असून त्यामध्ये वेताळ प्रतिष्ठान दरवर्षी आपला सहभाग दर्शवत असते. या स्वच्छता मोहिमेत वेताळ प्रतिष्ठानच्या ४० हुन अधिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेत गड परिसर स्वच्छ केला.

फोटोओळी – वेताळ प्रतिष्ठानच्या ४० हून अधिक कार्यकर्त्यांनी यशवंत गडाची स्वच्छता केली.

You cannot copy content of this page