दळवी महाविद्यालय ‘उडान’मध्ये पथनाट्यात जिल्ह्यात प्रथम

⚡कणकवली ता.०७-: तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने नुकत्याच संपन्न झालेल्या ‘उडान’ महोत्सवात पथनाट्यात प्रथम क्रमांक पटकावला. या निमित्ताने दळवी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या माध्यमातून कणकवली कॉलेज कणकवली येथे जिल्‍हास्तरीय उडान महोत्‍सव नुकताच संपन्न झाला. यात दळवी महाविद्यालयाने ‘नाश अनिष्ट प्रथांचा अधोगतीच्या मुक्तीचा’ या विषयावर पथनाट्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.
यात बीएएमएमसी, बीएस्सी-आयटी, बीबीआय, बीएमएस, बीएएफच्या अंतीम वर्षातील विद्यार्थी राकेश राठोड,दीप पारकर,सुनील चव्हाण,सत्यवान गावकर,चैतन्य,मुशरफ काझी,साकी मानाजी, कृष्णकुमारी इस्वलकर,ज्योती कदम, शारदा साटम,आदिती पाताडे, वृषाली ळायले, सोनाली सापळे यांचा सहभाग घेतला होता. यांना शेखर गवस यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी, समन्वयक श्रीपाद वेलींग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले

You cannot copy content of this page