Headlines

सत्तेच्या पाच वर्षात महेश कांदळगावकर यांनी मालवणला अधोगतीकडे नेले

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा घणाघाती आरोप;पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून साडेसहा कोटींचा विकास निधी मालवण (प्रतिनिधी) माजी खासदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र सुवर्णजयंती महाअभियान योजनेंतर्गत मालवण शहराच्या विकासासाठी ६ कोटी ५२ लाख रुपये एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे. शहराच्या विकासाला नवी दिशा…

Read More

दीपक पाटकर यांच्यावतीने दांडी येथे कॉनव्हेक्स मिरर

⚡मालवण ता.२३-: मालवणचे भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या माध्यमातून दांडी रामभाऊ मीठबावकर मार्ग येथे कॉनव्हेक्स मिरर स्व:खर्चातून बसविण्यात आला आहे. अपघातांचा धोका टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार दीपक पाटकर यांनी तात्काळ मिरर बसविल्याने गग्रामस्थांच्या वतीने दांडी येथे पाटकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजयुमोचे मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांच्यासह रमाकांत धुरी, मुकुंद आचरेकर,…

Read More

सौ.सायली परब यांचे निधन

⚡कणकवली ता.२३-: आचरे – समर्थनगर येथील रहिवासी व मूळच्या मुणगे – कारिवणेवाडी येथील सौ.सायली सुनिल परब ( 52) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचरादरम्यान त्यांचे निधन झाले.भूमिअभिलेख कणकवली कार्यालयाचे सेवानिवृत्त अधिकारी सुनिल परब यांच्या त्या पत्नी होत. भिरवंडे आमनिपाचेवाडी येथे माहेर असलेल्या पूर्वाश्रमीच्या जागृती सखाराम सावंत या…

Read More

तेरेखोल नदीपात्रातील बेकायदा वाळू उपसा रोखा

कास सरपंच प्रवीण पंडीत यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष.. ⚡बांदा ता.२३-: तेरेखोल नदीपात्रात कास व सातोसे गावाच्या हद्दीत होणार्‍या बेकायदा वाळू उपशाबाबत कास ग्रामपंचायत प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कास सरपंच प्रवीण पंडीत यांनी वाळू उपसा रोखण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. यात वाळू माफियांकडून ग्रामस्थांवर हल्ले होत असून पोलीस प्रशासन माफियांना पाठीशी घालत असल्याचा…

Read More

जप्त केलेल्या वाळू साठ्याचा २८ रोजी लिलाव

⚡मालवण ता.२३-: महिन्याभरापूर्वी मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने महिन्याभरापूर्वी देवली येथील माळरानावर वाळू वाहतूक करणारे २८ डंपर पकडतानाच ३३२ ब्रास अनधिकृत वाळूचा साठा जप्त केला होता. तर आंबेरी येथे १,१४४ ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त केला होता. या वाळू साठ्याची प्रतिब्रास ६०० एवढा दर निश्चित करून लिलाव प्रक्रिया दि. २८ फेब्रुवारी सकाळी…

Read More

रोटरॅक्ट क्लब ऑफ युथ बांदाच्यावतीने स्वच्छ्ता मोहीम

बांदेश्र्वर भूमिका मंदिर परिसरात राबविला उपक्रम बांदा/प्रतिनिधीरोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे संत गाडगेबाबा महाराज जयंतीचे औचित्य साधून श्री देव बांदेश्वर-भूमिका मंदिर परिसराची आज स्वच्छता करण्यात आली.यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, दत्तराज चिंदरकर, निहाल गवंडे, अक्षय कोकाटे, साईस्वरूप देसाई, मुईन…

Read More

बांदा अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपने मिळालेली रक्कम गृहागर येथील जीवन जोती मतिमंद शाळेला प्रदान

यापूर्वीही चिपळूण येथील शाळेला दिले होते साहित्य बांदा/प्रतिनिधीगुहागर येथील श्री देव व्याडेश्वर आयोजित बीच महोत्सवात बांदा येथील सुप्रसिद्ध अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपच्या कलाकारांनी विविध स्टॅच्यू सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. ग्रुपला मिळालेल्या प्रोत्साहन रकमेतून शृंगारतळी (ता. गुहागर) येथील जीवन जोती मतिमंद प्रशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत ग्रुपच्या सदस्यांनी एक आदर्श समाजासमोर ठेवला. यापूर्वी चिपळूण…

Read More

मालवणात २८ रोजी युवक मेळाव्याचे आयोजन

⚡मालवण ता.२३-: मालवण शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मंगळवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण येथील दैवज्ञ भवनच्या सभागृहात युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे युवकांना मार्गदर्शन करताना स्वयंरोजगाराच्या दिशा आणि नव्या शैक्षणिक धोरणातील बदल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती माजी…

Read More

तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडून पुस्तकांचे वाटप

⚡मालवण ता.२३-: शिवजयंतीचे औचित्य साधून मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या वतीने “शिवाजी कोण होता ?” या पुस्तकाच्या दोनशे प्रतींचे मालवण येथील टोपीवाला हायस्कुल व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार येणाऱ्या पिढीला समजले पाहिजेत, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी मागील वर्षी पासून आपण विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा…

Read More

रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालत नसल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले

गुरुदास गवंडे; पोलिसांनी परप्रांतीयांची नोंद ठेवावी. ⚡बांदा ता.२३-: पोलीस गस्त घालत नसल्यामुळे रोनापाल मडुरा इन्सुली आधी परिसरात चोरट्यांनी लक्ष केंद्रित केल असल्याचा आरोप मनसेचे माजी तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केल आहे. दरम्यान बांदा परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोक राहतात परंतु त्याची नोंद पोलीस स्थानकात नाही याबाबत देखील गवंडे यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत त्यांनी…

Read More
You cannot copy content of this page