रोटरॅक्ट क्लब ऑफ युथ बांदाच्यावतीने स्वच्छ्ता मोहीम

बांदेश्र्वर भूमिका मंदिर परिसरात राबविला उपक्रम

बांदा/प्रतिनिधी
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे संत गाडगेबाबा महाराज जयंतीचे औचित्य साधून श्री देव बांदेश्वर-भूमिका मंदिर परिसराची आज स्वच्छता करण्यात आली.
यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, दत्तराज चिंदरकर, निहाल गवंडे, अक्षय कोकाटे, साईस्वरूप देसाई, मुईन खान आदी उपस्थित होते.
रोटरॅक्टच्या माध्यमातून वर्षभरात विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी दिली.

You cannot copy content of this page