जप्त केलेल्या वाळू साठ्याचा २८ रोजी लिलाव

⚡मालवण ता.२३-: महिन्याभरापूर्वी मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने महिन्याभरापूर्वी देवली येथील माळरानावर वाळू वाहतूक करणारे २८ डंपर पकडतानाच ३३२ ब्रास अनधिकृत वाळूचा साठा जप्त केला होता. तर आंबेरी येथे १,१४४ ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त केला होता.

या वाळू साठ्याची प्रतिब्रास ६०० एवढा दर निश्चित करून लिलाव प्रक्रिया दि. २८ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता देवली व आंबेरी येथील तलाठी कार्यालय येथे होणार आहे, अशी माहिती मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page