बांदा अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपने मिळालेली रक्कम गृहागर येथील जीवन जोती मतिमंद शाळेला प्रदान

यापूर्वीही चिपळूण येथील शाळेला दिले होते साहित्य

बांदा/प्रतिनिधी
गुहागर येथील श्री देव व्याडेश्वर आयोजित बीच महोत्सवात बांदा येथील सुप्रसिद्ध अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपच्या कलाकारांनी विविध स्टॅच्यू सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. ग्रुपला मिळालेल्या प्रोत्साहन रकमेतून शृंगारतळी (ता. गुहागर) येथील जीवन जोती मतिमंद प्रशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत ग्रुपच्या सदस्यांनी एक आदर्श समाजासमोर ठेवला. यापूर्वी चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेत देखील साहित्याचे वाटप करण्यात आले होते.
यावेळी ग्रुपचे संयोजक मनोज कल्याणकर आणि प्रशांत सावंत यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सोहम सातार्डेकर व संजय चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी बोलताना मनोज कल्याणकर म्हणाले की, ग्रुपच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात विविध स्टॅच्यू सादर केले जातात. या कलेला रसिकाकडून देखील प्रोत्साहन मिळते. यावेळी गोळा होणाऱ्या प्रोत्साहन रकमेतून विविध सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्याचा निर्णय आम्ही घेतला. याच माध्यमातून आम्ही या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. भविष्यात देखील शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

You cannot copy content of this page