⚡मालवण ता.२३-: मालवण शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मंगळवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण येथील दैवज्ञ भवनच्या सभागृहात युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे युवकांना मार्गदर्शन करताना स्वयंरोजगाराच्या दिशा आणि नव्या शैक्षणिक धोरणातील बदल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिली आहे.
स्पर्धात्मक युगात युवकांना स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आहेत. केंद्रिय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून अनेक रोजगारांना सबसिडी उपलब्ध असून याची सविस्तर माहिती या मेळाव्यातून दिली जाणार आहे. तसेच शैक्षणिक धोरणातील नवीन बदल याबाबत देखील मार्गदर्शन केले जाणार आहेत. तरी या मेळाव्याला युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
