⚡मालवण ता.२३-: शिवजयंतीचे औचित्य साधून मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या वतीने “शिवाजी कोण होता ?” या पुस्तकाच्या दोनशे प्रतींचे मालवण येथील टोपीवाला हायस्कुल व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार येणाऱ्या पिढीला समजले पाहिजेत, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी मागील वर्षी पासून आपण विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा संकल्प केला असून त्याच धर्तीवर गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता? ” या पुस्तकाचे वाटप केले असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. यावेळी टोपीवाला हायस्कुल व सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
