Headlines

संस्कारक्षम पिढीच्या निर्मितीसाठी पालकांची सजगता गरजेची…

प्रा. रुपेश पाटील यांचे प्रतिपादन;जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आसोली नंबर १ चा वार्षिक बक्षिस वितरण सोहळा संपन्न ⚡वेंगुर्ला ता.१६-: छत्रपती शिवराय घडले नाहीत तर जाणीवपूर्वक घडविले गेलेत. कारण राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांनी त्यांना बालवयातच शौर्य, धाडस, आत्मसन्मान आणि संस्कृती रक्षणाचे धडे दिले होते. अलीकडच्या काळात मोबाईल व चॅनेल संस्कृती फोफावल्यामुळे बालमनावर त्याचे दुष्परिणाम पाहावयास…

Read More

बांद्याहून वेंगुर्ला येथे जाणाऱ्या गाडीची वेळ वाढवला…

हेमंत मराठे यांच्या मागणीला यश; ⚡सावंतवाडी ता.१७-: मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला अखेर यश आले असून बांद्याहून वेंगुर्ला येथे जाणाऱ्या गाडीची वेळ वाढवून देण्यात आली आहे. मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी मुलांची परवड होत असल्याने एसटी फेरांच्या वेळेत बदल करावी अशा मागणीचे पत्र वेंगुर्ला आगार व्यवस्थापक विशाल शेवाळे यांना दिले होते.यात बांदा…

Read More

लाखे वस्तीला भेडवणारा स्लॅब गळती व ड्रेनेजचा प्रश्न अखेर मार्गी…

परशुराम चलवाडीचा पुढाकार; स्वखर्चातून केले काम… ⚡सावंतवाडी ता.१७-: शहरातील लाखे वस्तीला गेले कित्येक वर्ष भेडसावणारा घराच्या स्लॅब गळतीचा व ड्रेनेजच्या पाईपलाईन चा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी व त्यांची पत्नी सौ नीलिमा चलवाडी यांनी स्वखर्चातून मार्गी लावला. वेळोवेळी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही न सुटणारा प्रश्न चलवाडी दंपत्याने मार्गी लावल्याने अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटना…

Read More

सोनुर्ली येथे २० रोजी विज्ञान जत्रा

⚡सावंतवाडी ता.१७- माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली येथे श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली संचलित २० व २१ रोजी सकाळी ११ ते ४ पर्यंत विज्ञान जत्रा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम पुढीलप्रमाणे-गोवा सायन्स सेंटर पणजी यांचे सायन्स अॅान व्हीलचे प्रयोग , स्टेम लर्निग मुंबई यांचे कृतीयुक्त प्रयोग, वसुधंरा विज्ञान केंद्र नेरुरपार यांची फिरती…

Read More

महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार मध्ये मोठ्या प्रमाणात जनतेची लूट…

गुरुदास गवंडे यांचा आरोप; तहसीलदार यांना दिले निवेदन ⚡सावंतवाडी ता.१७-: महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट जनतेची केली जात आहे. त्यामुळे हा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे.याबाबत त्यांनी सावंतवाडी तहसीलदार अरूण उंडे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.

Read More

बांधकाम कामगारांना सर्व हक्क मिळण्यासाठी संघटना व लढ्याशिवाय पर्याय नाही..कॉ.शाम काळे

⚡देवगड ता.१६-: बांधकाम कामगारांना आपले सर्व हक्क मिळवून घेण्यासाठी व महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजना प्राप्त करण्यासाठी संघटना आणि संघर्ष हा एकमेव पर्याय आहे. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना कायद्यानुसार हक्काचे घर, वयाच्या 60 वर्षानंतर दहा हजार रुपये पेन्शन व कल्याणकारी मंडळाने घोषित केलेल्या सर्व 32 योजनाचा लाभ मिळून घेण्यासाठी संघटितपणे लढा देण्याची आवश्यकता आहे.१ मे…

Read More

स्वयंभू श्री देव बांदेश्र्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

बांदा दि.16 (प्रतिनिधी)- बांदा येथिल प्रसिद्ध व जागृत अशा स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. महाशिवरात्री शनिवार दि.18 फेब्रुवारी रोजी असून शुक्रवारी रात्री पालखी सोहळ्याने हा उत्सव आरंभ होईल. यानिमित्त पुढीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार दि 17 फेब्रुवारी…

Read More

अरविंद जाधव यांना कलाभूषण पुरस्कार

भंडारी हायस्कूलचे कलाशिक्षक म्हणून आहेत कार्यरत;राज्य कलाध्यापक संघ सिंधुदुर्गने केले सन्मानित मालवण (प्रतिनिधी) माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्लिश स्कूल मळगाव येथे आज पार पडलेल्या कलाविषयक कृती सत्रात राज्य कलाध्यापक संघ सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने दिला जाणारा कलाभूषण पुरस्कार मालवण येथील भंडारी ए….

Read More

२२ रोजी पहिली, दुसरीच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

क्रीडा तपस्वी कै शिवाजीराव भिसे यांच्या स्मरणार्थ आयोजन ⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडीतील क्रीडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे यांच्या स्मरणार्थ पहिली ते दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अनिल भिसे मित्रमंडळ यांच्याकडून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता शिव उद्यान येथे होणार असून, स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार…

Read More

आकेरी येथील रथोत्सव १९ फेब्रुवारीला…

⚡कुडाळ ता.१६-: आकेरी येथील प्रसिद्ध श्री देव रामेश्वर रथोत्सव रविवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला दरवर्षी माघ दशमीला सुरवात होते. यावर्षी माघ दशमी बुधवार दि.१५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पुराण पालखी, तसेच १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री पहाटे भाविकांचे अभिषेख,नवस , गार्हाणे, रात्री आडदशावतार आदी कार्यक्रम…

Read More
You cannot copy content of this page