अखिल भारतीय संयोजक विनोद तावडे मार्गदर्शन करणार
⚡कणकवली ता.२४-: लोकसभा प्रवास योजना,रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक राष्ट्रीय महामंत्री तथा योजनेचे अखिल भारतीय संयोजक विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार 25 मार्च 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता ‘स्मित मल्टीपर्पज हॉल’ तळेरे, वैभववाडी रोड येथे संपन्न होणार आहे.
या बैठकीला लोकसभा प्रवास योजनेचे प्रदेश सहसंयोजक प्रमोद जठार,प्रदेश सचिव निलेश राणे,कोकण संघटनमंत्री शैलेंद्र दळवी,आ. नितेश राणे,लोकसभा प्रभारी संदीप लेले, sजिल्हाध्यक्ष राजन तेली,जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी पदाधिकारी यांनी आपल्या कार्य अहवालासह वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन लोकसभा प्रवास योजना (रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ) संयोजक अतुल काळसेकर यांनी केले आहे.
