केसरकर अर्धवट कामे मार्गी लावा…

अन्यथा एप्रिलफुल आंदोलन; मायकल डिसोजा यांचा इशारा

⚡सावंतवाडी ता.२४-: आमदार दीपक केसरकर यांनी आश्वासन दिलेली व अपूर्ण असलेली कामे ३१ मार्चपूर्वी मार्गे लावावे अन्यथा एक एप्रिल रोजी मतदार संघातील सदर कामाच्या ठिकाणी ठाकरे शिवसैनिक जाऊ एप्रिल फुलचे बॅनर लावून केसरकर यांचा पोलखोल करणार असल्याचा इशारा ठाकरे शिवसेना गटाचे जि. प. माजी सदस्य मायकल डिसोजा यांनी दिला आहे.

दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करत आहेत त्यांनी आमदार हटाव असे विधाने केले आहेत. त्यामुळे भाजप आणि केसरकारांमधील दरी ही आता स्पष्ट झाल आहे त्यामुळे आम्हीही आता लवकरच आमदार हटाव मोहीम घेऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page