वेशभूषा स्पर्धेत विहान गावकर व दुर्वेश पवार प्रथम

मालवण दि प्रतिनिधी
हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने काल घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत लहान गटात विहान गणेश गावकर( देऊळवाडा- मालवण ) तर मोठ्या गटात दुर्वेश सचिन पवार याने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने लहान व मोठा अशा दोन गटात वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यात १०६ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा उर्वरित निकाल असा- लहान गट – द्वितीय- वेदांत सारंग, तृतीय- मीरा पोळ, उत्तेजनार्थ- देवदत्त शिरोडकर, भक्ती शिर्सेकर, मोठा गट- द्वितीय- जयेंद्र केळुसकर, तृतीय- विभूती ढोके, उत्तेजनार्थ- सार्थक भोगल, अवनिश मेथर

विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी विजय केनवडेकर, प्रशांत हिंदळेकर, आप्पा लुडबे, श्वेता यादव, श्री. दूधवडकर, दीपा शिंदे, आकांक्षा शिरपुटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळी- हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page