मालवण (प्रतिनिधी)
गेली वीस वर्षे मालवणात गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा वारसा जोपासत काल मालवण शहरातून काढलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत सामाजिक कार्यकर्त्यांना सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली मालवणी मुलखातील महिलांनी सादर केलेले रोंबाट लक्षवेधी ठरत सर्वांच्याच पसंतीस उतरले. लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांचा सहभाग असलेल्या या रोंबाट मध्ये शांती तोंडवळकर यांनी साकारलेल्या ‘कांतारा’ च्या वेशभूषेसह महिलांनी साकारलेल्या विविध पौराणिक वेशभूषा आकर्षक ठरल्या. मालवणात पहिल्यांदाच अशाप्रकारे महिलांचे रोंबाट काढण्यात आले.
मालवणात दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. यामध्ये लहान मुले व तरुण मंडळी विविध वेशभूषा साकारतात. यावर्षी सामाजिक कार्यकर्त्यांना शिल्पा खोत यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य महिला ग्रुप तर्फे सादर झालेले महिलांचे रोंबाट या स्वागत यात्रेचे खास आकर्षण ठरले. यासाठी गेले पंधरा दिवस या महिलांनी मेहनत घेतली. यामध्ये शांती तोंडवळकर – कांतारा, मानसी घाडीगावकर – धनगर, दीपा पवार – दशावतारी राजा, दीक्षा जाधव – दैत्यासुर, प्रियंका औंधे – दशावतारी राजा, प्रतिभा चव्हाण – वासुदेव, तन्वी भगत – नारद, अंकिता पवार – दशावतार राजा, दिपाली परब – दशावतार राजा, साक्षी मयेकर – राणी, अश्विनी आचरेकर – लक्ष्मी, श्रेया पारकर -संकासुर, विभूती ढोके- राम, निर्भया- राधा, श्लोक जाधव-वाघ सोंग, गौरेश घाडीगावकर – मोरवाली बाई, दुर्वांक घाडीगावकर- भूत, सहिल तोडणकर- गणपती, सायबु- मारुती, तनिष्का खोत – राजमाता, जय परब- कृष्ण, भिल्ल – जयश्री शेटगे, महेश वालिकर, संतोष कट्टीमनी, सायबु कट्टीमनी, भीमाशंकर कट्टीमनी, महादेवी कट्टीमनी, रांजीता चुरी, श्लोक जाधव, निर्भया जाधव, रक्षिता चूरी, परशुराम चूरी, पालखी नृत्य – सायली कांबळी, श्वेता, साक्षी, दिया, स्वरूपा, तनिष्का मोहिते, वारकरी – श्रीयश व श्रीमय विजय औंधे यांच्यासह शिल्पा खोत, आर्या गावकर दीपिका धुरी, नेहा ढोके, कोमल, माधवी तिरोडकर, दर्शना कासवकर, पार्थ आचरेकर यांनी आकर्षक वेशभूषा साकारल्या. तर इतर ३५ महिला नऊवारी साडी नेसून सहभागी झाल्या होत्या. यात धुरीवाडा शाळेच्या लहान मुलांचा राजा अयोध्येचा हा चित्ररथही सहभागी झालेला. शिक्षिका सौ. श्वेता यादव यांच्या सहकार्यातून साकारलेल्या या चित्ररथात राम – दुर्वेश पवार, सीता – मंजिरी गोवेकर, लक्ष्मण – तन्मय सारंग, हनुमान – हिमांशू बापर्डेकर या मुलांनी पौराणिक पात्रे साकारली.
या रोंबाट मध्ये सहभागी महिलांनी पारंपारिक नृत्य सादर केली. शांती तोंडवळकर यांनी कांताराच्या सादरीकरणाने वाहवा मिळवली. तर शिल्पा खोत यांच्यासह इतर महिलांनी ढोल वादन केले. महिलांनी प्रथमच साकारालेल्या या रोंबाटने मालवण वासियांची मने जिंकली.
या रोंबाट साठी रंगभूषाकार तारक कांबळी व त्यांचे सहकारी तसेच माजी नगरसेवक यतीन खोत, भाई कासवकर, सौ. श्वेता यादव, भाऊ सामंत, संदीप बोडवे, गणपत मयेकर, स्मृती कांदळगावकर यांचे सहकार्य लाभले.
