Headlines

मोती तलाव फुटपाथ फ्लेवर ब्लॉक बसविताना पाणी मारावे

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.१६-: येथील मोती तलावाच्या फुटपाथवर फ्लेवर ब्लॉकचे काम सुरू आहे. तसेच त्या भागाचे सिमेंट काम सुरू आहे. मात्र, त्यावर पाण्याचा वापर केलेला दिसत नाही. त्यामुळे सदरचा फुटपाथ जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे नगर परिषदेत तात्काळ दखल घेऊन “त्या” ठिकाणी केलेल्या कामावर दररोज पाणी मारण्यात यावे, अशी मागणी माजी…

Read More

कमी पटसंख्या शाळा बंद होणार नाहीत; अफवांवर विश्वास ठेवू नका

मंत्री दीपक केसरकर : वेंगुर्लेत सतरावे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन; राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार ⚡वेंगुर्ले ता.१६-: शिक्षकांच्या रिक्त असलेल्या 70 टक्के जागा येत्या सहा महिन्यात भरण्यात येतील. शिक्षकांनी वेळेवर शाळेत गेल्यास कोणीही कारवाई करणार नाही. भविष्यात पटसंख्या नोंद आपोआपच राज्यशासनाके जाईल अशी टेक्नॉलॉजी आणत आहोत. नवीन शिक्षण धोरण राबवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम पाठिंबा देतात….

Read More

जुनी पेन्शन सुरू करण्यासाठी आमचे सरकार गंभीर

शिक्षक समितीच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही ⚡वेंगुर्ले ता.१६-: राज्यातील शाळेला कोणालाही बोट दाखविण्याची संधी नाही. शिक्षक हा प्रामाणिकपणे शिकविण्याचे काम करीत आहे. त्यांच्या प्रयोगामुळे मुलांच्या नवनवीन ज्ञानात भर पडत आहे. धाडसी निर्णय घेणारे सरकार बसलेले आहे. अनेक प्रलबित प्रश्न सोडविण्यासाठी धाडसी निर्णय घेवू. प्रत्येक प्रश्नाला सामोरे जाणारे हे सरकार आहे. तुमच्या हक्काचे सरकार…

Read More

एमएसएमईच्या वाढ आणि विकासाची व्याप्ती विषयावर कणकवलीत राष्ट्रीय चर्चासत्रसह प्रदर्शन

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी रोजी उद्घाटन.. ⚡कणकवली ता.१६-: एमएसएमई मंत्रालय, भारत सरकार उद्योजकता रोजगार आणि उपजीविकेच्या संधींच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे, सदरहू मंत्रालय एमएसएमईसाठी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय चर्चासत्र सह-प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. एमएसएमईच्या वाढ आणि विकासाची व्याप्ती या विषयावर कणकवली येथे 19…

Read More

धामापूर, काळसे रस्त्यावर गतिरोधक घाला

दोन्ही गावच्या सरपंचांचे सबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना निवेदन ⚡मालवण ता.१६-: मालवण – चौके – नेरुरपार कुडाळ या मुख्य रस्त्यावर काळसे आणि धामापूर हद्दीतील रस्त्यावर तातडीने गतिरोधक घालावेत या मागणीचे निवेदन धामापूर सरपंच सौ. मानसी परब आणि काळसे सरपंच सौ. विशाखा काळसेकर यांनी बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग , जिल्हा पोलीस अधिक्षक , प्रादेशिक…

Read More

कलमठ येथे १९ फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा

⚡कणकवली ता.१६-: शिवजयंती निमित्तछत्रपती शिवजयंती उत्सव समिती, कलमठच्या वतीने रविवार १९ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा दोन गटात होणार आहे.या स्पर्धा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आहेत. या २ गटात होणार आहे. ह्यामध्ये इयत्ता १ली ते ४थी व ५ वी ते ७ वी असे दोन गट करण्यात आले आहेत. या वकृत्व स्पर्धेचे…

Read More

कणकवलीत सकल मराठा समाजाच्यावतीने शिवजयंती उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम

⚡कणकवली ता.१६-: कणकवली येथे सकल मराठा समाजाच्यावतीने शिवजयंती उत्सव २०२३ निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन रविवार १९ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले आहे.त्या निमत्ताने वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि महिलांसाठी पैठणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तर रात्री ९ वाजता डबलबारीच्या जंगी सामना होणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन,सकाळी ११…

Read More

आजगाव-धाकोरे येथील आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत

वातावरणातील सततच्या बदलामुळे आंबा पिकावर दुष्परिणाम ⚡सावंतवाडी ता.१६-: तालुक्यातील आजगाव-धाकोरे (वसवाचे तळे) येथील आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वातावरणातील सततच्या बदलामुळे आंबा फळावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झाला आहे. हाता तोंडाशी आलेलं आंबा पीक वातावरणातील अती उष्णतेमुळे वाया गेल आहे. यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत.आधीच कर्ज काढून आंबा बागायतीची देखभाल, औषध फवारणी केली असून अचानक…

Read More

मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे दिग्दर्शक अभिजित वारंग व कलाकारांचा २६ रोजी सत्कार

⚡मालवण ता.१५-: मालवण येथील मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बॅ. नाथ. पै. सेवांगण येथे मूळ सिंधुदुर्गातील असलेले प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक अभिजित वारंग यांचा आणि त्यांचे सहकारी अभिनेता, अभिनेत्री यांचा त्यांच्या मराठी चित्रपट सृष्टीतल्या योगदानाबद्दल सत्कार करून सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी दिग्दर्शक अभिजित वारंग यांच्यासह…

Read More

समीर चांदरकर यांना कला गौरव पुरस्कार प्रदान

⚡मालवण ता.१५-: श्रीरंग कलादर्पण फाउंडेशन,पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा कलागौरव पुरस्कार मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर यांना प्रदान करून गौरविण्यात आले. पुणे येथील बालगंधर्व कलादालन येथे श्री तिरुपती बालाजी यांच्या जीवन चरित्रावर आधारित रांगोळी प्रदर्शन व कला गौरव पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार चांदरकर यांना प्रदान करण्यात आला. पुण्याचे महापौर व भाजपचे…

Read More
You cannot copy content of this page