राज घराण्याने जागा देण्यास तयारी दर्शविलेली नाही;गुणाजी गावडे यांचा केसरकर यांच्यावर आरोप;वेत्ये येथे जागा देण्यास तयार असल्याचं केला पुनरुच्चार
⚡सावंतवाडी ता.२३-: राज घराण्यातील कोणीही जागेची संमती दर्शवली नसताना मल्टी पेशालिस्ट हॉस्पिटलला जागा द्यायला तयारी दर्शवली म्हणून केसरकर यांनी कस काय जाहीर केले..? मल्टिस्पेशालिटी भुमिपूजन केलेली जागा चोरीला गेली आहे का? असा प्रश्न युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना केला आहे,.
दरम्यान जागा भेटत नसेल तर वेत्ये येथील जागा देण्यासाठी आम्ही आजही तयार आहोत. त्यांनी भूमिपूजन केलं त्या जागेचा प्रश्न प्रलंबित असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी नारळ फोडलात. त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असून मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून ते लवकरात लवकर व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. परंतु वारंवार आपण नुसते जाहिरात करत आहात. या हॉस्पिटलचा प्रश्न सुटला आता लवकरात लवकर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभे राहणार, असे सांगत एक प्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचे काम केसरकर करत असल्याचा आरोप श्री गावडे यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे आमदार दीपक केसरकर यांना पुन्हा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल ची आठवण झाली आणि नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा त्यांनी जाहीर करून टाकलं मल्टी पेशालिस्ट हॉस्पिटल लवकरच होणार. पत्रकार परिषद घेऊन दीपक केसरकर यांनी आजपर्यंत अशी अनेक विकास कामे अनेक वेळा जाहीर केली आहेत आणि हे आता जनतेला ठाऊकही झालेला आहे.असा टोला ही गावडे यांनी केसरकर यांना यावेळी लगवाला.
