जिल्हाध्यक्ष पद बदलणार ; राजन तेलींची माहीती
⚡सावंतवाडी ता.२३-: संघटनेतील नियमाप्रमाणे जिल्हाध्यक्ष पद बदलले जाणार आहे, आगामी निवडणुका लक्षात घेता आपल्याला संघटना मजबूत करायची आहे त्यामुळे आपल्याकडे ही जबाबदारी नको असे आपण वरिष्ठांना कळविले आहे असे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अनेक जण इच्छुक आहेत मात्र वरिष्ठ जो निर्णय देतील तो सर्वाना मान्य असेल कणकवलीतून आमदार नितेश राणे कुडाळ मालवण मधून निलेश राणे सावंतवाडी ची जबाबदारी ही माझ्याकडे आहे. मात्र असे असले तरी याठिकाणी कोणीही पदाधिकारी इच्छा व्यक्त करू शकतो असेही ते म्हणाले.
