⚡सावंतवाडी ता.२३-: राणी पार्वती देवी हायस्कूलच्या एसएसची बॅच १९९३-९४ च्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विद्यार्थी प्रिय माजी प्राचार्य गुरुवर्य श्री. व्ही. बी. नाईक सर यांना एक आराम खुर्ची भेट देण्यात आली.
भारतीय परंपरेत गुरु शिष्य या नात्याला फार महत्व आहे आणि तोच धागा पकडून १९९३-९४ च्या माजी विद्यार्थ्यांनी हिदू नववर्ष म्हणजे
गुढी पाडव्यादिवशी श्री. व्ही. बी. नाईक सर यांची भेट घेत त्यांना ही भेट दिली. यावेळी श्री गुरुदास देवस्थळी, श्री पद्मराज मुणगेकर, श्री संदीप सामंत, श्री दिलीप गांवकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
