क्रेडीट कोणाला जाणार हे न पाहता प्रश्न सुटावा यासाठी काम करा…

राजन तेली; मल्टीस्पेशलिस्ट व कबुलायतदार दोन्ही प्रश्नावर सरकार सकारात्मक..

⚡सावंतवाडी ता.२३-: मल्टीस्पेशलिस्ट व कबुलायतदार गावकर प्रश्न सुटावा हे महत्वाचे आहे, त्यामुळे क्रेडीट कोणाला जाणार हे न पाहता प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न झाला पाहीजे असा टोला भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मंत्री दिपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला.

दरम्यान राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्या हा एक छोटा जिल्हा असला तरी विकास कामांसाठी 3 हजार कोटीच्या निधी शिंदे-भाजप सरकाराने दिले असून त्यामुळे जिल्यातील सुरू असलेली काम ही सर्व दर्जेदार झाली पाहिजे यासाठी देखील आमचे प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब,जिल्हा बँक संचालक महेश सांरग,शहराध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page