अन्यथा ग्रामसडक योजना विभागावर देणार धडक;
माजगाव सरपंच, ग्रामस्थांचा इशारा
⚡सावंतवाडी ता.२४-: माजगाव चिपटेवाडी येथील पुलाचे काम गेल्या महिन्याभरापासून रखडलेले आहे. तेथील राहणाऱ्या रहिवाशासाठी पर्याय मार्ग नसून त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसात हे काम सुरू न केल्यास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कुडाळ कार्यालयावर ग्रामस्थांच्या समावेत धडक देऊ असा इशारा सरपंच, ग्रामस्थांनी दिला आहे.
